समाजमाध्यमांवरील खोट्‍या मेसेजपासून सावधान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजमाध्यमांवरील खोट्‍या मेसेजपासून सावधान!
समाजमाध्यमांवरील खोट्‍या मेसेजपासून सावधान!

समाजमाध्यमांवरील खोट्‍या मेसेजपासून सावधान!

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : ‘आता हार्ट अॅटॅकची चिंता सोडा... पाहा नवीन तंत्रज्ञान अशा प्रकारची सीटी अँजिओग्राफी की जिच्याद्वारे हार्ट ब्लॉक्स डायरेक्ट काढले जातात... जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध, पाच हजार रुपये खर्च... व्हिडीओ अवश्य पाहा व गरजूंपर्यंत पोहोचवा...’ अशा स्वरूपाचे संदेश सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र ते खोटे असून जे. जे. रुग्णालय प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. अशा खोट्या व्हिडीओंची आणि संदेशांची माहिती समाजमाध्यमांवर पसरवू नये, असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी केले आहे.

जे. जे. रुग्णालयात केवळ पाच हजार रुपयांत हृदयातील ब्लॉंकेजेस काढले जात आहेत. शिवाय त्याबाबतची शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून केली जात असल्याचा संदेशही व्हायरल व्हिडीओसोबत प्रसारित केला जात आहे. तुमच्याकडे असलेले ग्रुप आणि संपर्क क्रमांकावर तातडीने संदेश पाठवा, असे आवाहनही केले जात आहे. जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संयज सुरासे यांनी संबंधित मेसेज खोटा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जे. जे. रुग्णालयात अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेस पात्र असलेल्या रुग्णांना सदर उपचार पद्धती कॅशलेस पद्धतीने मोफत उपलब्ध आहे. मात्र, संबंधित व्हिडीओ आणि त्यासोबतची माहिती खोटी आहे. अशा प्रकारचे खोटे व्हिडीओ आणि माहिती नागरिकांनी समाजमाध्यमांवर पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.