महिलांची बहुपत्नीक प्रथेने फरफट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांची बहुपत्नीक प्रथेने फरफट
महिलांची बहुपत्नीक प्रथेने फरफट

महिलांची बहुपत्नीक प्रथेने फरफट

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : बहुपत्नीत्व प्रथेमुळे शहरातील मुस्लिम महिलांची फरपट वाढल्याचे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. ‘भारतीय मुस्लिम महिला आंदोलन’ संस्थेने याबाबतचे सर्व्हेक्षण केले. यात बहुपत्निक विवाहामुळे स्त्रीला आर्थिक आणि इतर त्रासांव्यतिरिक्त प्रचंड भावनिक आघातही होत आहे. याशिवाय शैक्षणिक आणि आर्थिक वंचिततेमुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे. यातून मुस्लिम महिलांनी बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्याची गरज अधोरेखित केली आहे; तर बहुपत्नीत्व प्रथा संपुष्टात आणण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पत्नी असलेल्या महिलांचा समावेश होता.

...असे झाले सर्व्हेक्षण
- बहुपत्नीत्वाचा सामना करणाऱ्या मुंबईतील २५० मुस्लिम महिलांचा सर्व्हे.
- यात ५० केस स्टडी गोळा करून २८९ प्रश्नावली तयार करण्यात आल्या.

काय वाटते महिलांना?
बहुपत्नीत्व बेकायदा असायला हवे- ८४ टक्के
दुसरी पत्नी ठेवणाऱ्या पतीला शिक्षा झाली पाहिजे- ७३ टक्के

हे आहेत निष्कर्ष
१० वीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण न केलेल्या पहिल्या पत्नी- ७७ टक्के
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले पती- ९ टक्के
उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नसलेल्या महिला- ४३ टक्के
१० हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिला- २ टक्के

...अशीही प्रकरणे
पहिल्या लग्नाच्या वेळी पतीचे वय २१ ते २६ वर्षांदरम्यान- ५ टक्के
दुसऱ्या लग्नाच्या वेळी पतीचे वय २१ ते २६ वर्षांदरम्यान- ३८
केवळ पालकांनी जोडीदार निवडल्याने केलेले विवाह- ४९ टक्के

मानसिक समस्यांमध्ये वाढ
बहुतेक वेळा उदास- ५० टक्के
पुरेशी झोप नसणे- ४३ टक्के
वारंवार वेदना आणि वेदना- ३३ टक्के
स्वतःबद्दल चांगले न वाटणे- ३३ टक्के
आत्महत्या करण्याची प्रवृत्ती- ४३ टक्के
मुलांच्या काळजीने सहन करणे- ४५ टक्के

कमी वयातील विवाह (१८ पेक्षा कमी)
पहिल्या पत्नी असलेल्या मुली- २९ टक्के
दुसऱ्या पत्नी असलेल्या मुली- १८ टक्के

शिक्षणाची वानवा
१० वी पेक्षा कमी शिकलेल्या पहिल्या पत्नी- ७७ टक्के
१० वी पेक्षा कमी शिकलेल्या दुसऱ्या पत्नी- ७१ टक्के
निरक्षर पत्नी- २० टक्के
दहावीपर्यंत शिक्षण- ११ टक्के
पदवीधर पत्नी- ४ टक्के
पदव्युत्तर- १ टक्का

आर्थिक अस्थिरता
कोणतेही उत्पन्न नसलेल्या पहिल्या पत्नी- ४२ टक्के
हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पहिल्या पत्नी- ४० टक्के
कोणतेही उत्पन्न नसलेल्या दुसऱ्या पत्नी- ४५ टक्के
हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या दुसऱ्या पत्नी- ३४ टक्के

पत्नीची परवानगी नकोशी?
पतीने दुसऱ्या लग्नाची माहिती दिलेल्या पत्नी- २३ टक्के
पतीच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बाहेरून माहिती मिळालेल्या पत्नी- ७२ टक्के
दुसरा विवाह करताना पतीने परवानगी न घेतलेल्या पत्नी- ९० टक्के

दुसऱ्या लग्नाची कारणे
दुसऱ्यांदा प्रेमात पडलेले पती- ३५ टक्के
मूल होत नाही- ११ टक्के
विधवा किंवा घटस्फोटित व्यक्तीला आधार- ६ टक्के
पालकांनी सांगितले म्हणून- १२ टक्के
पत्नी अंथरुणाला खिळल्यामुळे- ४ टक्के
पहिल्या पत्नीमध्ये दोष- १० टक्के
मुलगा हवा होता म्हणून- ६ टक्के
शरीरसुख मिळत नव्हते- ११ टक्के

दुसऱ्या लग्नानंतरचे नाते
सोबत न राहणारे पती- ४१ टक्के
कमी वेळ घालवणारे पती- २५ टक्के
भांडणाचे प्रमाण वाढले- १६ टक्के
अजिबात काळजी न घेणे- १५ टक्के

पहिल्या पत्नीची मासिक देखभाल
करतात- ४० टक्के
करत नाहीत- ४७ टक्के
अनियमितता- १३ टक्के

निवाऱ्याची स्थिती
पालकांच्या घरी गेलेल्या- ४१ टक्के
पूर्वीप्रमाणेच घरात राहतात- ३५ टक्के
स्वतः भाड्याच्या घरात राहतात- १४ टक्के
पतीने दिलेल्या नवीन घरात राहतात- १० टक्के

मुस्लिम महिलांना नागरिक म्हणून त्यांच्या घरात सन्मानाची वागणूक मिळवून देणे ही राज्याची जबाबदारी आहे. तिहेरी तलाकप्रमाणे याविरोधातही सरकारने ठोस कायदा करावा. यासाठी जनजागृतीसह जनआंदोलन उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. नूरजहाँ साफिया नियाज, संस्थापक, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन

बहुपत्नीत्वाला धर्माचा अविभाज्य भाग म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. अल्जेरिया, बहरिन, मलेशिया आणि मोरोक्कोमध्ये बहुपत्नीत्व प्रतिबंधित आहे. ट्युनिशिया, तुर्की, किर्गिझ प्रजासत्ताक, ताजिकिस्तान आणि उझ्बेकिस्तानमध्ये या विरोधात कडक कायदा आहे. या प्रकारची पावले सरकारने उचलावीत.
- जकिया सोमन, सह संस्थापक, भारतीय मुस्लिम महिला आंदोलन