फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर सावरकरांचा पुतळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर सावरकरांचा पुतळा
फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर सावरकरांचा पुतळा

फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर सावरकरांचा पुतळा

sakal_logo
By

संजीव भागवत : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ८ जुलै १९१० रोजी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरावर जहाजातून ऐतिहासक उडी मारली होती. त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण आणि तो वारसा जतन करण्यासाठी या बंदरावर लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा उभा करण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. येत्या ८ जुलैपूर्वीच मार्सेलिस बंदरावर सावरकरांचा मोठा पुतळा उभा राहणार असल्याची माहिती मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष व सावकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

मार्सेलिस बंदराजवळ ब्रिटिशांना चकवा देत समुद्रात उडी मारली होती, त्याची आठवण म्हणून सावरकर यांचा पुतळा मार्सेलिस बंदरावर उभारण्यात यावा यासाठी मागील २८ वर्षांपासून मागणी केली जात होती; तर दुसरीकडे त्या घटनेला २०१० मध्ये १०० पूर्ण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन केंद्र सरकारकडे हा पुतळा उभा करण्याची मागणी करण्यात आली होती; मात्र तत्कालीन सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयानेही यासाठी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे सावरकर यांचा पुतळा उभा राहण्याची प्रक्रिया तशीच लांबणीवर पडली होती. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार विद्यमान केंद्र सरकारने हा पुतळा बसवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.

मार्सेलिस बंदरावरील सावरकर यांचा पुतळा बसवण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि इतर सर्व प्रकारचे सहकार्य हे केंद्राकडून दिले जाणार आहे. यासाठी लवकरच समिती स्थापन होऊन हा विषय वेगाने मार्गी लागेल.
- रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर स्मारक