Fri, Feb 3, 2023

भारत हायवेचा दोन हजार कोटींचा आयपीओ
भारत हायवेचा दोन हजार कोटींचा आयपीओ
Published on : 23 December 2022, 2:58 am
मुंबई, ता. २३ : पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणारा ट्रस्ट भारत हायवेतर्फे दोन हजार कोटी रुपयांच्या आयपीओसाठी डीआरएचपी सादर करण्यात आले आहे. बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे या इश्यूतील रकमेचा भरणा होणार असून ७५ टक्के रक्कम संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी; तर २५ टक्के रक्कम बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी असेल, यातून मिळणारी रक्कम विशेष प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी वापरली जाणार आहे. दरम्यान ३० जून २०२२ रोजी या ग्रुपचे उत्पादन ४७ कोटी रुपये होते.