नाताळ सणानिमित्त्त देखाव्यातून जनजागृती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाताळ सणानिमित्त्त देखाव्यातून जनजागृती
नाताळ सणानिमित्त्त देखाव्यातून जनजागृती

नाताळ सणानिमित्त्त देखाव्यातून जनजागृती

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : नाताळ सणानिमित वेगवेगळे देखावे मुंबईत तयार करण्यात आले आहेत. या वर्षी लहान मुलांचे वाढते मोबाईलचे वेड आणि माझी मुंबई स्वच्छ मुंबईवर देखाव्यातून जनजागृती करण्यात आली आहे. नाताळ सणानिमित्त संपूर्ण जगास प्रेम आणि माणुसकीची शिकवण देणाऱ्या लोकोद्धारक, प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा देखावा (ख्रिसमस क्रिब) प्रतिवर्षाप्रमाणे तयार करण्यात आला आहे.

सामाजित कार्तकर्ते अशोक कुर्मी यांनी या देखाव्याद्वारे ‘लहान मुलांचे वाढते मोबाईलचे वेड’ आणि ‘माझी मुंबई स्वच्छ मुंबई’ अशा सामाजिक विषयांद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अशोक कुर्मी हे वेगवेगळे विषयांवर क्रिब बनवत असतात. यंदाचे क्रिब सात दिवसांत तयार केले गेले. कोविडमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठांमध्येही मोबाईलचे व्यसन जडले आहे. आता त्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. मुलांना जेवक असतानाही हातात मोबाईल लागतो. मोबाईल नाही दिला, तर जेवणार नाही, असे सांगत मुलं हट्ट करतात. मोबाईलचे व्यसन सुटावे, यासाठी व मुंबई स्वच्छ आणि सुंदर व्हावी यासाठीदेखील या क्रिबमधून संदेश देण्यात आल्याचे कुर्मी यांनी सांगितले. कोरोना काळात ही कुर्मी आणि त्यांचे काही स्थानिक मित्रमंडळी सक्रिय होते. मास्कवाटप, फिरती शाळा, जवळपास २ लाख घरांचे सॅनिटायड्ज, कोविडची वेगवेगळ्या वेशभूषेत जनजागृती असे अनेक उपक्रम यांनी राबवले. नाताळ निमित्त्ताने कुर्मी हे स्वतः नाताळबाबा बनून पालिकेच्या सहकार्याने ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे, याबाबतीत माटुंगा हिंदू कॉलनी ते दादर रेल्वे स्थानकांपर्यंत जनजागृती केली जाणार आहे.