
मुंबईत सहा गोवरबाधित रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : गोवरबाधित रुग्णसंख्येत होणारी वाढ कायम आहे. शुक्रवारी (ता. २३) दिवसभरात सहा नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ५१२ वर पोहोचली आहे. दिवसभरात २६ संशयित रुग्णांची नोंद झाल्याने या रुग्णांची संख्या ५,२८१ वर पोहोचली आहे. दरम्यान, विविध रुग्णालयात १७ व्हेटिंलेटर उपलब्ध असून चार रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
गोवंडी परिसरात गोवरचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर गोवरचा झपाट्याने प्रसार होत आहे. मुंबईत ७४ उद्रेक झाला असून ३५९ भागात गोवरचा फैलाव झाला आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला, भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर या भागात गोवरचे अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत गोवरचा घट्ट विळखा बसला असून गोवरबाधित रुग्णसंख्येत होणारी वाढ कायम आहे.