मलिक यांना न्यायालयाचा दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलिक यांना न्यायालयाचा दिलासा
मलिक यांना न्यायालयाचा दिलासा

मलिक यांना न्यायालयाचा दिलासा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने ६ जानेवारीपर्यंत खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी परवानगी दिली आहे. मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नुकताच नामंजूर केला आहे; मात्र त्यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. तसेच जे. जे. शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांना त्यांच्या तब्येतीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत; मात्र आज (ता. २३) हा अहवाल सादर होऊ शकला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांना ६ जानेवारीपर्यंत उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.

मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांनी वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळण्याची मागणी केली आहे. त्यांची एक किडनी निकामी होत असून गंभीर स्वरूपाचा आजार झाले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.