नाताळ, थर्टीफर्स्ट जल्लोषात गाण्यांसाठी ‘पीपीएल’ परवाना बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाताळ, थर्टीफर्स्ट जल्लोषात गाण्यांसाठी ‘पीपीएल’ परवाना बंधनकारक
नाताळ, थर्टीफर्स्ट जल्लोषात गाण्यांसाठी ‘पीपीएल’ परवाना बंधनकारक

नाताळ, थर्टीफर्स्ट जल्लोषात गाण्यांसाठी ‘पीपीएल’ परवाना बंधनकारक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि बारसह अन्य ठिकाणी बॉलीवूड किंवा अन्य गाणी लावण्यासाठी फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेडचा (पीपीएल) परवाना असणे आवश्यक आहे. अशा परवानाधारी आस्थापनांनाच गाणी लावण्याची परवानगी आहे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिले आहेत.

नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतामध्ये विविध व्यावसायिक आस्थापना सहभागी असतात. याचबरोबर अनेक ठिकाणी सार्वजनिकरीत्या कार्यक्रम आयोजित केले जातात. या पार्श्वभूमीवर ‘पीपीएल’चा परवाना दोन प्रकारे मिळवला जातो. यामध्ये नियमित वापरासाठी आस्थापनांना परवानगी मिळते, तसेच विशेष दिवसांसाठीदेखील परवानगी दिली जाते. यामध्ये नवीन वर्ष, नाताळ किंवा उत्सवाचे दिवस किंवा खासगी कार्यक्रम आदी येत असतात. आपल्याकडे संगीत आणि गाणी यांना विशेष महत्त्व आहे. अनेकदा सर्रासपणे त्याचा वापर व्यावसायिक ठिकाणी केला जातो; मात्र त्यासाठी आवश्यक असलेले नाममात्र परवाना शुल्क जमा केले जात नाही. यामुळे ‘पीपीएल’च्या नियमांचा भंग होत असतो; तर यामध्ये सहभागी कलाकारांवरही परिणाम होतो, असे पीपीएलचे म्हणणे आहे.