शिक्षणवारीची जल्लोषात सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षणवारीची जल्लोषात सांगता
शिक्षणवारीची जल्लोषात सांगता

शिक्षणवारीची जल्लोषात सांगता

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी झटणाऱ्या किशोर पवित्रा भगवान गणाई यांनी ऑगस्टपासून सुरू केलेल्या शिक्षणवारीची शुक्रवारी (ता. २३) सांगता झाली. या शिक्षणवारीत गोरगरिबांनी शक्य ती मदत करून वारीला सहकार्य केले. या वारीचा सांगता सोहळा प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य आणि पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या उपस्थितीत कुलाबा येथील शेकाप भवन येथे पार पडला. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी जगताप यांनी ६ ऑगस्ट २०२२ पासून कल्याण बापगाव ‘मैत्रकूल’ येथून व्हीलचेअरवर बसून शिक्षणवारी काढली. या वारीची सांगता शुकवारी (ता. २३) झाली. कल्याण ते कुलाबा अशी ही यात्रा सुरू झाली होती. यादरम्यान गोरगरिबांनी सढळ हस्ते मदत केली. यादरम्यान २५ लाखांची मदत नागरिकांकडून मिळाली. या मदतीचा वापर गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे. नागरिकांनी मदत केल्यास विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य संस्थेने ठेवले आहे.