विद्यार्थ्यांचा उद्योग पहाणीदौरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचा उद्योग पहाणीदौरा
विद्यार्थ्यांचा उद्योग पहाणीदौरा

विद्यार्थ्यांचा उद्योग पहाणीदौरा

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : विद्यार्थ्यांना कौटुंबिक व्यवसाय-उद्योग यांच्या व्यवस्थापनाची तंत्रे, कामकाज चालवण्यासाठीचे अद्यावत ज्ञान मिळावे यासाठी एनएमआयएमएसच्या प्रवीण दलाल स्कूल ऑफ आंत्रप्रेन्युअरशिप अँड फॅमिली बिझनेस मॅनेजमेंटतर्फे नुकतेच विद्यार्थ्यांना जागतिक अभ्यास दौऱ्यात मोठ्या उद्योगांमधील वरिष्ठांशी भेट घालून कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.

या दौऱ्यात विद्यार्थ्यांना बेल्जियम, ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड येथे रिडलग्लास, शिंडलर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, आयएमईसी अशा मोठ्या कंपन्यांमध्ये नेऊन प्रत्यक्ष कार्यानुभव देण्यात आला, अशी माहिती प्रा. सीमा महाजन यांनी दिली. या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी या कंपन्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाशीही थेट चर्चा केली. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ब्रँड पोझिशनिंग, डिझाईन तसेच नवकल्पना याबाबत जगात काय घडते आहे, या कंपन्यांसमोरील आव्हाने, परदेशी बाजारपेठा विकसित करताना येणाऱ्या अडचणी, त्यासाठी लागणारी आधुनिक भूमिका याची माहिती मिळाली.

आपला व्यवसाय विकासाच्या पुढील टप्प्यावर नेण्यासाठी नेमके कसे तांत्रिक कौशल्य लागते किंवा आपल्या व्यवसायात जागतिक दर्जाचे उत्तम कामकाज कसे व्हावे, हे त्यांना कळले. एखाद्या साध्या कल्पनेचे डिझाईन आणि आराखड्यात प्रत्यक्ष रूपांतर कसे करावे, हे त्यांना कॉमेट ग्रूपमध्ये पाहायला मिळाले. रसायन उद्योगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान जर्मनच्या बीएसएफ फॅक्टरीत बघायला मिळाली तर जागतिक पुरवठा साखळीबाबतही त्यांना एरडिंगर कंपनीत माहिती मिळाली. स्वित्झर्लंडच्या शिंडलर या बहुराष्ट्रीय कंपनीत त्यांना लिफ्ट, सरकते जिने, सरकते पादचारी मार्ग यांची माहिती घेताना भविष्यातील आधुनिक शहरे कशी असावीत याचाही आराखडा आपल्या मनात तयार करता आला.

-----------
विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या
या उद्योग दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना त्या त्या देशांची संस्कृती तसेच व्यवसायाचे नीतिनियम, रीतीरिवाज आणि परदेशात व्यवसाय विस्तार कसा करावा, याची अमूल्य माहिती मिळाली. यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याचे प्रा. सीमा महाजन यांनी सांगितले.