Sat, Feb 4, 2023

जेजेमध्ये तुनिषा शर्माचे शवविच्छेदन
जेजेमध्ये तुनिषा शर्माचे शवविच्छेदन
Published on : 25 December 2022, 3:34 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : दूरचित्रवाणी मालिकेतील अभिनेत्री तुनिषा शर्मा हिचा आत्महत्या केल्याने शनिवारी मृत्यू झाला होता. शनिवारी उत्तररात्री तिचा मृतदेह जे जे रुग्णालयात नेण्यात आला. त्याच वेळी शवविच्छेदन प्रक्रियेला सुरुवात करून रविवारी पहाटे ४.३० वाजता शवविच्छेदन पूर्ण झाल्याची महिती येथील डॉ. संजय सुरासे यांनी दिली.
तुनिषा शर्माने शनिवारी दुपारी आत्महत्या केली होती. सायंकाळी ५ वाजता तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते. त्यानंतर रात्री उशिरा जे जे रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला. पहाटे साडेचार वाजता तुनिषाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.