हिवाळी अधिवेशनाच्या नावाने शिक्षकांकडून खंडणी वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिवाळी अधिवेशनाच्या नावाने शिक्षकांकडून खंडणी वसुली
हिवाळी अधिवेशनाच्या नावाने शिक्षकांकडून खंडणी वसुली

हिवाळी अधिवेशनाच्या नावाने शिक्षकांकडून खंडणी वसुली

sakal_logo
By

नागपूर, ता. २५ : नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या नावाने शिक्षण विभागातील आणि इतर विभागांतील अधिकारी हे राज्यातील मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षकांकडून खंडणी वसूल करत आहेत. अशा अधिकाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी व त्यांचे सहकारी यांच्या वास्तव्याची जबाबदारी नागपूर शहरात सरकारकडून करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील अधिकारी, तसेच अन्य विभागातील अधिकारी यांच्या नावाखाली संस्थाचालक, ठेकेदार, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व अन्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल करत आहेत. ही बाब सरकारची प्रतिमा मलीन करणारी आहे, त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गाणार यांनी केली आहे.