मुंबई रेबीजमुक्त करण्याचा प्रयत्न : पालिकेचे दोन वर्षाचे टार्गेट ; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई रेबीजमुक्त करण्याचा प्रयत्न : पालिकेचे दोन वर्षाचे टार्गेट ;
मुंबई रेबीजमुक्त करण्याचा प्रयत्न : पालिकेचे दोन वर्षाचे टार्गेट ;

मुंबई रेबीजमुक्त करण्याचा प्रयत्न : पालिकेचे दोन वर्षाचे टार्गेट ;

sakal_logo
By

मुंबई दोन वर्षांत रेबीजमुक्त
महापालिकेचे टार्गेट

मिलिंद तांबे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. २६ : मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. पर्यायाने डॉग बाईटची सोबतच पालिकेच्या हेल्थ सेंटरमध्ये रेबीजची प्रकरणे वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने रेबिजमुक्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईला दोन वर्षांत रेबिजमुक्त करण्याचा प्रयत्न देवनार पशुवधगृहाने सुरू केला आहे. या वृत्ताला देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दुजोरा दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेने २०१४ नंतर डॉग सेन्सेस म्हणजेच भटक्या कुत्र्यांची गणना झालेली नाही. मागील आकडेवारीनुसार मुंबईत ९५ हजाराहून अधिक भटक्या कुत्र्यांची नोंद झाली होती. त्यानंतर आता ८ वर्षे उलटून गेल्याने कुत्र्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत अडीच लाख भटकी कुत्री असण्याचा अंदाज आहे. पुढील वर्षांत सरासरी १ लाख कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे.

मुंबईला रेबीजमुक्त करण्यासाठी पालिकेच्या देवनार पशुवधगृह विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. या अंतर्गत जानेवारी पासून ''रेबीज ड्राइव्ह वॅक्सीनेशन'' सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अंतरराष्ट्रीत स्तरावर उल्लेखनीय काम करणाऱ्या चार ''एनजीओ'' सोबत करार करण्यात येणार आहे. या ''एनजीओ''चयक माध्यमातून रेबीज वॅक्सीनेशन ड्राईव्ह घेण्यात येणार आहे.

या मोहीम अंतर्गत वॅक्सीनेशनसोबत कुत्र्यांचे ''आयडेंटिफिकेशन'' आणि ''रजिस्ट्रेशन'' ही केले जाणार आहे. यासह ''पेट शॉप'' आणि ''ब्रिडिंग सेंटर''साठी नियमावली आणण्याचा विचार देखील आहे. यामुळे भटक्या कुत्रे वाढीच्या मुळाशी जात येणार आहे.याशिवाय ज्या परिसरात मादी कुत्र्यांची संख्या जास्त असेल तेथे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
......
असा असेल ड्राइव्ह :
भटकी कुत्री अधिक असणाऱ्या विभागातून मोहिमेला सुरुवात होणार आहे.एका कुत्र्याला वर्षातून निदान तीनवेळा तरी डोस दिला जाणार आहे. एक डोस दिल्यानंतर त्या कुत्र्यावर स्टॅम्प मारला जाईल. हा स्टॅम्प पुढील ३/४ महिने राहील याची खबरदारी घेतली जाणार आहे.
......
पश्चिम उपनगरांमध्ये भटकी कुत्री अधिक
पश्चिम उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक आहे. याच भागात कुत्र्यांकडून पाठलाग होणे तसेच डॉग बाईट चे प्रमाण अधिक आहे. यावरून हा अंदाज लावण्यात आला आहे. या भागात कुत्री पाळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेक लोक आपकी हौस पूर्ण झाल्यानंतर कुत्र्यांना रस्त्यावर सोडून देत असल्याचे ही समोर आले आहे.यामुळेच पश्चिम उपनगरात भटक्या कुत्र्यांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जाते.
......
वॉर्ड स्तरावर युनिट :
''रेबीज वॅक्सीनेशन ड्राइव्ह'' वॉर्ड निहाय पथक नेमले जाणार आहे. यामध्ये सामाजिक संस्थांचा समावेश असणार आहे. त्यांच्या माध्यमातून ''रेबीज वॅक्सीनेशन ड्राइव्ह'' राबवले जाईल. यामुळे वॉर्ड निहाय भटकी कुत्री आणि त्यांच्या लसीकरणाची नोंद ठेवण्यास ही मदत मिळणार आहे.
......
नवीन वॅक्सीनेशनचा प्रयोग :
सध्या रेबीज साठीचे जे वॅक्सीनेशन दिले जाते त्याचा प्रभाव हा केवळ ३ ते ४ महिने राहतो. त्यामुळे कुत्र्यांना वर्षातून ३ ते ४ वेळा लस देणे आवश्यक ठरते. जे शक्य होत नाही. यासाठी परदेशात वापरल्या जाणाऱ्या वॅक्सीनेशनच्या पर्यायाची चाचपणी केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरला तर कुत्र्यांना ३ वर्षातून एकदा वॅक्सीनेशन करावे लागणार आहे.
......
रि-प्रोडक्शन दर नियंत्रणात आणणार :
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.यासाठी पालिकेच्या माध्यमातून ''स्टेरलायझिंग'' करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी मुंबईत सध्या दोन केंद्र असून या केंद्रांवर ''स्टेरलायझिंग'' ची गती वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
........