आयआयटी मुंबईत आजपासून ‘मूड इंडिगो’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयआयटी मुंबईत आजपासून ‘मूड इंडिगो’
आयआयटी मुंबईत आजपासून ‘मूड इंडिगो’

आयआयटी मुंबईत आजपासून ‘मूड इंडिगो’

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : आयआयटी मुंबईत उद्यापासून (ता. २७) ‘मूड इंडिगो’ सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात होणार आहे. युरोपीय आणि भारतीय संगीत, नाटक, जीवनशैली, साहित्य, संभाषण कौशल्य, ललित कला, संगीत, नृत्य आदींचा हा महोत्सव असून तो चार दिवस चालणार आहे. महोत्सवात देशभरातील विविध कलावंत, कवी, तंत्रस्नेहींसह सुमारे दीड लाख विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आयआयटीकडून देण्यात आली. मूड इंडिगोची यंदाची ही ५२ वी आवृत्ती आहे. यंदा सर्व कार्यक्रम ऑफलाईन पद्धतीने होणार असले, तरी याचा जगभरातील वाचकांना आनंद घेता यावा यासाठी my.moodi.org वर विविध कार्यक्रमांचे लाईव्ह प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. महोत्सवातील संगीत कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार जोडी विशाल-शेखर सहभागी होणार आहेत. तसेच ‘ह्युमर फेस्ट’मध्ये समय रैना आणि अनुभव सिंह बस्सी उपस्थित राहणार आहेत.