कोचर दाम्पत्यास दिलासा देण्यास नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोचर दाम्पत्यास दिलासा देण्यास नकार
कोचर दाम्पत्यास दिलासा देण्यास नकार

कोचर दाम्पत्यास दिलासा देण्यास नकार

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणात नुकतीच अटक झालेल्या चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सीबीआयने दाखल केलेली फौजदारी तक्रार रद्दबातल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुटीकालीन न्यायालयात आज न्या. माधव जामदार आणि न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.
या प्रकरणात सीबीआयने केलेली अटक बेकायदा असल्याचा दावा आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांनी उच्च न्यायालयात केला आहे. सीबीआयने नोंदवलेला गुन्हा चुकीचा असल्याचा दावा करत तो एफआयआर रद्द करण्याची मागणीही करण्यात आली; मात्र याप्रकरणी तूर्तास तातडीच्या सुनावणीची आवश्यकता नाही असे न्यायालयाने सांगितले.
कोचर दाम्पत्याला सीबीआयने शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत अटक केली होती. त्यानंतर शनिवारी मुंबई सत्र न्यायालयात त्यांना रिमांडसाठी हजर करण्यात आले. सध्या ते सीबीआय कोठडीत आहेत. या रिमांडला कोचर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सुटीकालीन खंडपीठासमोर कोचर यांचे वकील कुशल मोर यांनी ही याचिका सादर करत त्यावर तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती.
...
नियमित न्यायालयात दाद मागा!
बॅंकेने कोचर यांच्यावर जानेवारी २०१९ मध्ये गुन्हा नोंदवला आहे; मात्र नियमानुसार आवश्यक त्या पूर्वपरवानगीशिवाय हा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे कोचर यांना करण्यात आलेली अटक आणि त्यांना विशेष न्यायालयाने सुनावलेली कोठडी ही बेकायदा आहे, असा युक्तिवाद मोर यांनी केला; मात्र न्यायालयाने त्यांना २ तारखेला नियमित न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले. कोचर पती-पत्नीसह व्हिडीओकॉनचे वेणुगोपाळ धूत यांनादेखील सीबीआयने अटक केली आहे.