Sun, Jan 29, 2023

गोवर लशीसाठी सोनू सूदचे आवाहन
गोवर लशीसाठी सोनू सूदचे आवाहन
Published on : 27 December 2022, 3:53 am
मुंबई, ता. २७ : मुंबई महापालिकेच्या १६ वॉर्डांमध्ये गोवर संसर्ग पसरला होता. कोविड काळात लसीकरण चुकल्याने गोवरची साथ बळावली असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. आता गोवर संसर्ग घटत असून गोवरच्या लसीकरण करून घेण्यासाठी अभिनेता सोनू सूद आवाहन करत असल्याचा व्हिडिओ मुंबई महापालिकेडून प्रसारित करण्यात आला आहे.
गोवर मुंबईत पसरला असताना धारावी मालवणी पठाणवाडीसारख्या परिसरात गोवर संसर्ग मुलांमध्ये दिसून येत आहे. काहींचा यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुलांना गोवर लसीकरण करा, लसीकरण केंद्रांवर जाऊन पालकांनी मुलांना लस देऊन संसर्ग कमी करण्यास मदत करावी, असे आवाहन अभिनेता सोनू सूद या व्हिडीओमध्ये करताना दिसून येत आहे.