वांद्रे वसाहतीतील रहिवाशांना वाजवी दरात सदनिका! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांद्रे वसाहतीतील रहिवाशांना वाजवी दरात सदनिका!
वांद्रे वसाहतीतील रहिवाशांना वाजवी दरात सदनिका!

वांद्रे वसाहतीतील रहिवाशांना वाजवी दरात सदनिका!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता. २९ : वांद्रे येथील शासकीय वसाहतीमध्ये २५ ते ३० वर्षांपासून राहणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांना मालकी हक्काच्या सदनिका वाजवी दरात देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. याबाबत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
वांद्रे वसाहत पुनर्विकास आणि तेथील रहिवासी याबाबत सदस्य ॲड. अनिल परब यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वांद्रे येथील शासकीय वसाहतीचा पुनर्विकास प्रजासत्ताक कोरिया यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. यासाठी बृहत् आराखडा आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी दक्षिण कोरियाच्या कोरिया लँड अँड हाऊसिंग कॉर्पोरेशनसोबत करारनामा केला आहे. २५ ते ३० वर्षांपासून राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना वाजवी दरात सदनिका देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असेही फडणवीस यांनी सांगितले.