सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ जानेवारीपासून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ जानेवारीपासून
सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ जानेवारीपासून

सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ जानेवारीपासून

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सीबीएसईमार्फत विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा होणार असून, याच कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण सीबीएसईच्या संकेतस्थळावर टाकायचे आहेत. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यास ऑनलाईन प्रणालीत अनुपस्थितीची नोंद करावी. संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा याच कालावधीत अन्य दिवशी घेऊन ‘रीशेड्युल्ड’ अशी नोंद करण्याबाबत सीबीएसईने स्पष्ट केले आहे.