Fri, Feb 3, 2023

विमानतळावर परदेशी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
विमानतळावर परदेशी प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
Published on : 29 December 2022, 5:26 am
मुंबई, ता. २९ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून आलेल्या प्रवाशाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. विमानतळावर बुधवारी (ता. २८) परदेशातून ९७ विमाने आली, ज्यामध्ये १६,९९३ प्रवासी होते. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दोन टक्के म्हणजेच ३७७ प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात ३५० प्रवाशांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले, त्यात एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. हा प्रवासी नेमका कोणत्या देशातून आला यासंदर्भात पालिका विमानतळ प्रशासनाकडून माहिती घेत आहे. परदेशातील प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील. याआधी २४ डिसेंबरला लंडनहून आलेल्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.