परदेशांतून आलेल्या तीन प्रवाशांना कोरोना परदेशातून आलेल्या तीन प्रवाशांना कोरोना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशांतून आलेल्या तीन प्रवाशांना कोरोना
परदेशातून आलेल्या तीन प्रवाशांना कोरोना
परदेशांतून आलेल्या तीन प्रवाशांना कोरोना परदेशातून आलेल्या तीन प्रवाशांना कोरोना

परदेशांतून आलेल्या तीन प्रवाशांना कोरोना परदेशातून आलेल्या तीन प्रवाशांना कोरोना

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : संपूर्ण जगाला चिंतेत टाकणाऱ्या बीएफ.७ चा धोका मुंबईत वाढला आहे. स्वीत्झर्लंड, मॉरिशस व लंडन या देशांतून आलेल्या तीन प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली असता तिन्ही कोरोना बाधित आढळले आहेत. हे तिन्ही प्रवासी नवी मुंबई, पुणे व गोवा येथील आहेत. मुंबईत कोरोनाबाधित आढळलेले ६२ व विमानतळावर आढळलेले ३ अशा एकूण ६५ बाधितांच्या घशाचे स्वॅब पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले असून चार ते पाच दिवसांत अहवाल येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी शुक्रवारी दिली.
तिन्ही बाधितांना होम क्वारंटाईन केले असून ६५ बाधितांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत मुंबईची धाकधूक वाढली आहे. चीन, जपान, कोरिया, अमेरिका, ब्राझील या देशांत बीएफ.७ ने थैमान घातले आहे. भारतातील गुजरात व ओडिसात बीएफ.७ चे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईसह भारताची चिंता वाढली आहे. केंद्र सरकारने राज्यांना ‘अलर्ट’ राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबईत दररोज तीन हजार कोरोना चाचण्या करण्यात येतात. तसेच मुंबई विमानतळावर दररोज १५ हजार प्रवासी येत असून त्यापैकी लक्षणे नसलेल्या दोन टक्के प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत असून थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे.
...
७२ तासांचा रिपोर्ट बंधनकारक
चीन, जपान, कोरिया, अमेरिका, ब्राझील, सिंगापूर, थायलँड, हाँगकाँग या देशांत बीएफ.७ चा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासांचा आरटीपीसीआर रिपोर्ट सादर करणे बंधनकारक आहे.
...
दीड लाख चाचण्यांची क्षमता
कोरोना आटोक्यात असल्यामुळे पालिकेकडे सद्यस्थितीत सुमारे तीन हजार चाचण्या होत असून किमान ५ ते १० कोरोनाबाधित आढळत आहेत. मात्र बीएफ.७ चा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढल्यास पालिका दररोज दीड लाख कोरोना चाचण्या करू शकेल, अशी क्षमता असल्याची माहितीही डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
...
कोविडबाबत महापालिकेला सतर्क
ओमायक्रोन बीएफ.७ चा नवीन व्हेरिएंट जगभरात पसरत आहे. या प्रकाराबाबत मुंबई महापालिकेलाही सतर्क करण्यात आले आहे. मात्र मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात असून सध्या मास्क सक्तीचा नसल्याचे पालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले. पालिका कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार असून त्यासाठी आवश्यक पुरेशी उपकरणे सज्ज आहेत. गरज भासल्यास बंद पडलेली कोविड केंद्रे १५ दिवसांत पुन्हा सुरू करता येतील, अशी तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालिकेकडे १,१५० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. आता पालिका प्रतिदिन ११५० मेट्रिक टन ऑक्सिजन तयार करू शकते, असे ही अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले. याशिवाय ८७२ आयसीयू खाटा, ८६३ व्हेंटिलेटर, चार हजार डॉक्टर, ७,५०० परिचारिका आणि ४,५०० पॅरामेडिकल कर्मचारी कोविडच्या बिकट परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. पालिकेकडे दररोज १.५ लाख कोविड चाचण्या करण्याची क्षमता आहे, असेही ते पुढे म्हणाले.