कोविडबाबत महापालिकेला सतर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविडबाबत महापालिकेला सतर्क
कोविडबाबत महापालिकेला सतर्क

कोविडबाबत महापालिकेला सतर्क

sakal_logo
By

सध्या तरी मुंबई मास्कसक्तीतून मुक्त!
कोविडचा नवा व्हेरिएंट नियंत्रणात

जगभरात ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंट पसरत असला तरी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या तरी मास्क सक्तीची गरज नाही, असे पालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
--
मुंबईत परदेशातून आलेल्या तीन प्रवाशांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत. प्रवासी मॉरिशस, स्वित्झर्लंड आणि ब्रिटनमधून आले होते. तिन्ही बाधितांना मुंबई, गोवा आणि पुण्यात होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. पालिकेने कोविडची लागण झालेले आणखी ६२ नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.

विमानतळावरील प्रवाशांच्या थर्मल स्क्रीनिंगबाबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार २ जानेवारीपासून विमानतळावर प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्क्रीनिंग आणि संशयित रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. यापूर्वी सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात आली होती. आता उच्च जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना गेल्या ७२ तासांचा निगेटिव्ह कोविड अहवाल सोबत ठेवावा लागेल. १ जानेवारीपासून सर्व प्रवाशांना त्यांचे अहवाल ‘एअर सुविधा’ पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पालिकेकडे ११५० टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ऑक्सिजनच्या समस्येशी झगडणाऱ्या पालिकेने नंतर आपली क्षमता वाढवली. पालिकेने १२ रुग्णालयांमध्ये २० ऑक्सिजन प्लांट सुरू केले होते. त्यामुळे ऑक्सिजनची समस्या जाणवली नाही. पालिकेला दुसऱ्या लाटेत दररोज २३० टन ऑक्सिजनची गरज होती. आता पालिका प्रतिदिन ११५० टन ऑक्सिजन तयार करू शकते, असे संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

पालिका अलर्ट
- आयसीयू खाटा ः ८७२
- व्हेंटिलेटर ः ८६३
- डॉक्टर ः ४०००
- परिचारिका ः ७,५००
- पॅरामेडिकल कर्मचारी ः ४,५००
- रोजची कोविड चाचणी क्षमता ः १,५०,०००

पालिकेकडे औषधांची कमतरता नाही. कोविड रुग्णांसाठी पीपीई किट, एन ९५ मास्क आणि औषधे पुरेशा प्रमाणात आहेत. सर्व जंबो कोविड केंद्रांची सामग्री सुरक्षित ठेवण्यात आली आहे. कोविडचे रुग्ण वाढल्यास १५ दिवसांत जंबो कोविड केंद्रे पुन्हा बांधली जाऊ शकतात.
- संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त