किशोरी पेडणेकरांना आयुक्तांनी भेट नाकारली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किशोरी पेडणेकरांना आयुक्तांनी भेट नाकारली
किशोरी पेडणेकरांना आयुक्तांनी भेट नाकारली

किशोरी पेडणेकरांना आयुक्तांनी भेट नाकारली

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची भेट घेण्यासाठी मुख्यालयात आल्या होत्या; मात्र चहल यांनी कामाचे कारण सांगून भेटण्यास नकार दिला. सुमारे अर्धा तास आयुक्त कार्यालयात थांबलेल्या पेडणेकर यांना भेटीविनाच परतावे लागले.
वैयक्तिक कामानिमित्त आयुक्तांना भेटायला आले होते; मात्र ते अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये व्यग्र असल्याने बैठक होऊ शकली नाही, असे पेडणेकर यांनी सांगितले. चहल-पेडणेकर भेट न होण्यामागे दोन दिवसांपूर्वी पालिकेमधील शिवसेनेचे कार्यालय ताब्यात घेण्याविषयीचा वाद असल्याचे बोलले जात आहे. आयुक्त चहल आणि पेडणेकर यांच्यातही जुने वैर आहे. महापौर असताना त्यांनी चहल यांना बैठकीला बोलावले होते; मात्र आयुक्तांनी कोरोनाचे कारण देत तेथे जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर पेडणेकर संतापल्या आणि त्यांनी चहल यांची तक्रार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. दरम्यान, आयुक्तांनी सर्व कार्यालये सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी माझी विनंती आहे. येथून जनतेचे प्रश्न सोडविण्यास मदत होते, असे पेडणेकर म्हणाल्या.