क्लार्क पदावर ४० अभियंते नियुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्लार्क पदावर ४० अभियंते नियुक्त
क्लार्क पदावर ४० अभियंते नियुक्त

क्लार्क पदावर ४० अभियंते नियुक्त

sakal_logo
By

मुंबई, ता. ३१ : राज्य सहकारी बँकेमध्ये तब्बल ३० वर्षांनंतर सेवक भरती प्रक्रिया राबवली गेली आहे. आज (ता. ३१) ८६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. विशेष म्हणजे या प्रक्रियेत ४० अभियंत्यांची निवड कारकून (क्लार्क) आणि कनिष्ठ अधिकारी पदांवर झाली आहे.

राज्य सहकारी बॅंक राज्यातील सहकारी संस्थाची शिखर बँक आहे. या प्रक्रियेत २४२ जागांसाठी राज्यभरातून पाच हजारांहून जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. एकूण १३५ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. राज्य बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली, तेव्हा बँकेत १,८४२ कर्मचारी होते. निवृत्ती व बँकेने राबवलेल्या स्वेच्छानिवृत्ती योजनेमुळे सध्या ६४३ कर्मचारी आहेत. २०११ मध्ये बँकेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली. गेल्या ११ वर्षांत बँकेचा एकूण व्यवसाय २८ हजार कोटींवरून सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

पहिल्या यादीतील ८६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. निवड झालेले सर्व उमेदवार उच्चशिक्षित असून, त्यामध्ये आठ उमेदवार बी. टेक, एम. टेक, ३१ उमेदवार सिव्हिल, कॉम्प्युटर इंजिनिअर व १० उमेदवार कृषी पदवीधर आहेत.
- विद्याधर अनास्कर, प्रशासक,
राज्य सहकारी बॅंक