मेस्माद्वारे संप मोडून काढा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेस्माद्वारे संप मोडून काढा!
मेस्माद्वारे संप मोडून काढा!

मेस्माद्वारे संप मोडून काढा!

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ ः ठाणे व नवी मुंबईत अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या वीज वितरण परवाना मागणीविरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संघर्ष समितीने पुकारलेला संप सरकारने मेस्मा कायदा वापरून मोडून काढावा, अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे.
अदाणीचा याबाबतचा अर्ज महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रलंबित असल्याने संघर्ष समितीने त्यांचे आक्षेप आयोगाकडे मांडावेत, परंतु त्याऐवजी संप करून ग्राहकांना वेठीस धरून प्रश्न सुटणार नाहीत. संघर्ष समितीच्या मागण्या त्यांच्या दृष्टीने कितीही समर्थनीय असल्या, तरी ग्राहकांचा अत्यावश्यक वीजपुरवठा बंद करून त्यांना हालअपेष्टा भोगायला लावणे हे योग्य नाही. त्यामुळे शासनाने मेस्मा कायद्याखाली संपावर त्वरित बंदी घालावी, अशीही मागणी त्यांनी केली.