अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी अखेरची मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी अखेरची मुदत
अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी अखेरची मुदत

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी अखेरची मुदत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसर अधिसूचित क्षेत्र (बीएसएनए), अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर आणि आसपासचे अधिसूचित क्षेत्र (एकेबीएसएनए) असलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विशेष नियोजन प्राधिकरणाच्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे प्रस्ताव सादर करू न शकलेल्यांना आता ३० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करता येणार आहे.

विशेष नियोजन प्राधिकरणातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय एमएमआरडीएने २३ मार्च २०२२ मध्ये घेतला होता. त्यानुसार अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबत आवश्यक असलेल्या कागदपत्रांची नियमावली तयार केली आहे. त्यानुसार नियोजन प्राधिकरण क्षेत्रातील बांधकामे नियमित करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. यानंतरही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर एमएमआरडीएने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार अद्यापही अर्ज करू न शकलेल्या नागरिकांना ३० जून २०२३ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. या कालावधीत प्रस्ताव सादर करणाऱ्यांना दंडात्मक शुल्कावर पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे.