उच्च न्यायालयाची देखरेख हवी!

उच्च न्यायालयाची देखरेख हवी!

मुंबई, ता. ११ : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाची देखरेख असणे आवश्यक आहे, अशी विनंती दाभोलकर कुटुंबीयांनी बुधवारी न्यायालयाकडे केली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा उद्देश अद्याप उघड झालेला नाही, असा युक्तिवाद या वेळी करण्यात आला.
पुणे सत्र न्यायालयात याप्रकरणी आरोपपत्र दाखल होऊन खटला सुरू झाला आहे. त्यामुळे कायद्यानुसार आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर देखरेख ठेवण्याची गरज नाही, अशी मागणी दोन आरोपींनी न्यायालयात याचिकेद्वारे केली. यावर कुटुंबीयांच्या वतीने आज भूमिका मांडण्यात आली. त्यांनी याचिकेला विरोध केल्याने सीबीआयने आपली भूमिका तीन आठवड्यांत स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी ३० जानेवारीपर्यंत तहकूब केली.
दाभोलकर कुटुंबीयांचे वकील अभय नेवगी यांनी याचिकेला विरोध केला. या प्रकरणी अद्याप काही आरोपी फरार आहेत, हत्येकरता वापरलेले हत्यार, दुचारी मिळालेल्या नाही. शिवाय हत्येमागचा उद्देश आणि सूत्रधाराचाही शोध लागलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाची देखरेख आवश्यकच असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com