Thur, Feb 9, 2023

आज राज्यात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण
आज राज्यात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण
Published on : 15 January 2023, 2:42 am
मुंबई, ता. १५ : राज्यात आज कोरोनाच्या ११ नवीन रुग्णांचे निदान झाले. आज १३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८८,३७७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एकाही करोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,६१,०२,८४७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३६,९३५ (०९.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण १३९ सक्रिय रुग्ण आहेत.