चेंबूर विभागातील महात्मा गांधी उद्यान कात टाकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेंबूर विभागातील महात्मा गांधी उद्यान कात टाकणार
चेंबूर विभागातील महात्मा गांधी उद्यान कात टाकणार

चेंबूर विभागातील महात्मा गांधी उद्यान कात टाकणार

sakal_logo
By

उद्यान सुशोभीकरणाच्या दिशेने
महापालिकेचे पाऊल
चेंबूर विभागातील कामासाठी निविदाप्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मुंबईतील उद्यानांची दुर्दशा झाल्याने पालिकेने आता त्यांच्या सुशोभीकरणासाठी कंबर कसली आहे. त्याअंतर्गत पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील उद्यानांच्या सुशोभीकरणाला सुरुवात झाली आहे. उद्यान विभागातर्फे चेंबूरमधील महात्मा गांधी मैदान, मराठी गार्डन आणि अतुर पार्कचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून सहा कोटी ८९ लाख ३२ हजार ८५६ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्याने दिली.

अनेक वर्षांपासून मुंबईच्या उद्यानांची दुर्दशा झाली आहे. अनेक उद्यानांत नागरिकांना बसण्यासाठी योग्य जागा नाही. उद्यानातील पदपथांवरही चालण्यात अडथळे येत आहेत. साधनांचीही दुर्दशा झाली आहे. त्यामुळे अखेर महापालिकेची उद्याने सुशोभित आणि अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महापालिकेच्या एम प्रभागातील महात्मा गांधी मैदान, एन. जी. आचार्य मराठे आणि अतुर पार्कचे अत्याधुनिकीकरण होणार आहे. त्यासाठी सहा कोटी ७९ लाख ३२ हजार ८८६ रुपये सर्वसाधारण खर्चाचे अंदाजपत्र तयार करण्यात आले आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालिका आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.