कोटक व एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीजची भागीदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोटक व एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीजची भागीदारी
कोटक व एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीजची भागीदारी

कोटक व एक्सक्लुसिव्ह सिक्युरिटीजची भागीदारी

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : कोटक सिक्युरिटीज लिमिटेडने इंदूरच्या एक्स्क्लुसिव्ह सिक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. त्या माध्यमातून तीस हजारांहूनही जास्त गुंतवणूकदारांना सेवा दिली जाईल. या भागीदारीमुळे कोटक सिक्युरिटीज आणि एक्स्क्लुसिव्ह सिक्युरिटीज या दोन्ही कंपन्यांना त्यांच्या देशभरातील ग्राहकांना तंत्रज्ञानावर आधारित गुंतवणूक उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी मदत होईल, अशी माहिती कोटक सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ जयदीप हंसराज यांनी दिली. शेअर ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून ही भागीदारी होणार आहे, त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची वाटचाल सुलभ होईल असेही ते म्हणाले.