डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे आज उद्घाटन

डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे आज उद्घाटन

मुंबई, ता. २९ : डॉ. होमी भाभा राज्य समूह विद्यापीठाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (ता. ३०) होणार आहे. मादाम कामा रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होईल. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च शिक्षण प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत उपस्थित राहणार आहेत.

या वेळी विद्यापीठामध्ये होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण होईल, अशी माहिती कुलगुरू कामत यांनी दिली. होमी भाभा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे काम शिशिर शिंदे, तसेच परिसर जडणघडणीचे काम जय केदार यांनी सवर्जनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केले. राज्य सरकारने २०१९ मध्ये बहुविद्याशाखीय फोकस असलेल्या आणि पहिल्यांदा स्थापन केलेल्या राज्यातील क्लस्टर विद्यापीठाला डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी असे नाव देण्यात आले होते. या विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार हा जवळच असलेल्या विज्ञान संस्थेतून सुरू होता. मात्र, आता छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर असलेल्या इमारतीत संस्थेच्या जागेत विद्यापीठाचे प्रशस्त कार्यालय उभे राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com