डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील तपास पूर्ण!

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणातील तपास पूर्ण!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील तपास पूर्ण झाला आहे, अशी माहिती सीबीआयच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात आज देण्यात आली. तसेच यासंबंधी नवीन तपास अधिकाऱ्यांनी दिलेला अहवाल दिल्ली मुख्यालयात सादर करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

दाभोलकर हत्याप्रकरणात नवीन तपास अधिकारी नियुक्त करण्यात आला होता. यातील तपासाचा अहवाल सीबीआयने दिल्ली मुख्यालयात पाठविला आहे. त्यामुळे यावर तीन आठवड्यानंतर भूमिका मांडू, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी खंडपीठाला सांगितले. पुणे सत्र न्यायालयात याबाबत खटला सुरू झाला आहे. ज्यामध्ये ३२ पैकी १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आल्याची माहिती सिंह यांनी दिली. या खटल्यातील आरोपी शरद काळसकर आणि विक्रम भावे यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. खटला सुरू झाल्यामुळे आता उच्च न्यायालयाने यावर नियंत्रण ठेऊ नये, कायद्यानुसार याची आवश्यकता नाही असा दावा आरोपींच्या वतीने करण्यात आला आहे.

न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली. दाभोलकर कुटुंबीयांच्या वतीने मात्र याचिकेला विरोध करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात मूळ सूत्रधार कोण आहे, याचा तपास लागलेला नाही. हत्येसाठी वापरलेले हत्यार, दुचाकी मिळालेले नाही, काही आरोपी फरार आहेत. त्यामुळे या तपासावर देखरेख ठेवावी, अशी मागणी ॲड. अभय नेवगी यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com