कुलगुरूंच्या निवडीसाठी समित्या अखेर जाहीर

कुलगुरूंच्या निवडीसाठी समित्या अखेर जाहीर

मुंबई, ता. ३० : मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज निवड समित्या जाहीर केल्या.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डी. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठाची कुलगुरू निवड समिती गठीत करण्यात आली आहे, तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकरिता कुलगुरू निवड समिती जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ हा १० सप्टेंबरलासंपला होता. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. दिंगबर शिर्के यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपव‍ण्यात आला आहे. तब्बल पाच महिने उलटून गेल्यानंतर राज्यपालांनी या विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी निवड समिती जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीत आयआयटी वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये तसेच हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश कुमार (यूजीसी प्रतिनिधी) हे सदस्य असतील.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ दिनांक १८ मे २०२२ रोजी संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर, जलसंपदा विभागाचे अतिर‍िक्त मुख्य सचिव दीपक कपूर तसेच कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर (यूजीसी प्रतिनिधी) हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कुलगुरू निवड समितीचे अन्य सदस्य असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com