Tue, March 21, 2023

कोकण शिक्षक मतदारसंघात ९१.०२ टक्के विक्रमी मतदान
कोकण शिक्षक मतदारसंघात ९१.०२ टक्के विक्रमी मतदान
Published on : 30 January 2023, 5:12 am
मुंबई, ता. ३० : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा एकूण पाच मतदारसंघात आज (ता. ३०) शांततेत मतदान झाल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
नाशिक, अमरावती पदवीधर; तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ टक्के आणि कोकण विभागात ९१.०२ टक्के असे इतके विक्रमी मतदान झाले. भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार गुरुवारी (ता. २) मतमोजणी होणार आहे, अशी माहितीही देशपांडे यांनी दिली.