तुनिषा आत्महत्या प्रकरणात केस डायरी दाखल

तुनिषा आत्महत्या प्रकरणात केस डायरी दाखल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज उच्च न्यायालयात केस डायरी दाखल केल्या. आरोपी शिझान खान, तुनिषा यांच्यासह आणखी एकाचा मोबाईल पोलिसांनी फोरेन्सिक विभागाकडे पाठवला आहे, अशी माहितीही आज देण्यात आली. शिझान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने उच्च न्यायालयात गुन्हा रद्दबातल करण्यासाठी याचिका केली. त्यावर आज न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पी. के. चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे ना, आरोपीकडून काही चिथावणीखोर वर्तन झाले आहे का, असे प्रश्न खंडपीठाने उपस्थित केले.

‘अलिबाबा-दास्तान-ए-काबूल’ या मालिकेत काम करणारी तुनिषा २१ वर्षांची होती. २४ डिसेंबर २०२२ ला ती पालघर येथील सेटवर कामानिमित्त आली तेव्हा आनंदी होती. त्यानंतर ती शिझानच्या रुममध्ये गेली; परंतु तिथून बाहेर निघताना ती खूप अस्वस्थ दिसत होती, असे सीसीटीव्ही फूटेजवरून आढळले असल्याचे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले. तसेच तीन मोबाईल फोरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठविले आहेत, असेही सरकारी वकील अरुणा कामत-पै यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तपास करावा; परंतु आरोपीचा ताबा आता आवश्यक नाही. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी ॲड. धीरज मिरजकर यांनी केली. यावर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिझानने जामीन मिळण्यासाठी स्वतंत्र याचिकाही दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com