
आज सामाजिक संघटनांची बैठक
मुंबई, ता. १२ : राज्यातील आंतरधर्मीय विवाहांचा माग घेणारी समिती स्थापण्यासाठी राज्य सरकारने शासनादेश काढला होता. त्याविरोधात राज्यभरातील सामाजिक, राजकीय, स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्षेप नोंदवला होता. त्याच पार्श्वभूमीवर सर्व संघटनांची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या समितीच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेने दिलेल्या विविध अधिकारांचे उल्लंघन होत आहे. सरकारने काढलेला आदेश हा समाजासाठी घातक आहे, असे या संघटनांनी सांगितले. मुंबईतील या बैठकीत ऑल इंडिया डेमोक्रेटिक वुमेन्स असोसिएशन, आवाज-ए-निस्वान, बेबक कलेक्टिव्ह, फोरम अगेन्स्ट व्हायोलन्स अगेन्स्ट वुमन, सेंटर फॉर डेव्हलपमेंट, रिसर्च अँड अॅक्शन, जन स्वास्थ्य अभियान, जस्टिस कोलिशन धार्मिक - महाराष्ट्र, कुसुमताई चौधरी महिला कल्याणी महाराष्ट्र महिला परिषद, मजलिस, फोरम फॉर सोशल जस्टिस, पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज, स्वाधार, दलित मानवाधिकार रक्षक नेटवर्क राष्ट्रीय महिला नेत्यांची परिषद, भारतीय ख्रिश्चन महिला चळवळ, महिला विकास केंद्र, नॅशनल असोसिएशन ऑफ इंडियन वुमन, मौलाना आझाद विचार मंच, महिला मुक्ती संघटना, परचम कलेक्टिव्ह, राष्ट्रीय एकता मंच, विद्रोही महिला मंच, कामगार एकता संघ, सावली सामाजिक आणि राजकीय संघटना, मुनाईक विचार मंच-वाशिम, राष्ट्रीय जनआंदोलन आघाडी, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.