सिनेटसाठी एक लाख १३ हजार मतदार

सिनेटसाठी एक लाख १३ हजार मतदार

मुंबई, ता. १२ : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी एक लाख १३ हजारहून अधिक जणांनी आतापर्यंत मतदार नोंदणी पूर्ण केली असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आला होता. या वेळी विद्यापीठाने विविध संघटनांच्या मागणीचा विचार करून ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीनेच केली होती; मात्र काही संघटना आणि आक्षेप घेतल्यामुळे तब्बल चारवेळा या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर अखेरची मुदत १ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी यादरम्यान दिली होती. तोपर्यंत एक लाख १३ हजार पदवीधर मतदारांनी मुंबई विद्यापीठाच्या मतदानासाठी मतदार म्हणून नोंदणी केली असल्याची माहिती आज (ता. १२) विद्यापीठाकडून देण्यात आली.

पहिल्यांदाच प्रक्रिया लांबणीवर
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी नवमतदार नोंदणीची प्रक्रिया ही मागील चार महिन्यांपासून सुरू आहे. पहिल्यांदाच दीर्घ कालावधीसाठी ही प्रक्रिया लांबणीवर गेल्याने नवीन सिनेट निवडणुकीची प्रक्रिया आहे. ती पूर्ण होण्यासाठी मार्च आणि एप्रिल महिना उजाडण्याची शक्यता आहे.

नवमतदारांची संख्या वाढली
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये मागील काळात युवा सेनेचा मोठा धबधबा होता. मात्र यावेळी युवा सेनेसोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन आणि इतर पुरोगामी विद्यार्थी संघटनांकडून मतदान नोंदणी केली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर नवमतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची माहिती देण्यात आली.

मुदतवाढीची शक्यता कमी
काही विद्यार्थी संघटनांनी ही मतदान नोंदणी एक लाख ३८ हजाराहून अधिक झाली असल्याचा दावा केला असला तरी त्यातील असंख्य मतदारांचे नोंदणी शुल्क न भरल्यामुळे ती नोंदणी अपुरी राहिली असावी, असे सांगितले जाते. मात्र विद्यापीठाकडून यापुढेही मुदतवाढ दिल्यास सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम आणखी दोन महिने लांबणीवर पडेल. त्यामुळे ही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे विद्यापीठातील अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com