आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज दीक्षांत सोहळा

sakal_logo
By

मुंबई ता. १२ : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत सोहळा उद्या (ता. १३) विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत सकाळी होणार आहे. यात १७ विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवीने गौरवण्यात येणार आहे. विविध विद्याशाखांतील ९६ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास आणि पंचायती राज, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री गिरीश महाजन, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभास अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय आरोग्य विज्ञान विद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन हे उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासीयता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १२,७२७ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ९६ विद्यार्थ्यांना १२४ सुवर्णपदक, एका विद्यार्थ्यास रोख रक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या १७ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे.