पालिकेचे डेब्रिजमुक्तीच्या दिशेने पाऊल

पालिकेचे डेब्रिजमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई, ता. १४ : मुंबईकरांची वाढत्या धुळीतून सुटका करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेने राडारोडा (डेब्रिज) मुक्तीच्या दिशेने पाऊल उचलले असून त्यासाठी २० वर्षांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी पालिका एक हजार २४ कोटींचा खर्च करणार आहे.

मुंबईला अलीकडे धुळीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. धूळ आणि वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ढासळते आहे. हवामान बदल, रस्त्यांवरील व बांधकामातील धूळ, वाहतूक कोंडी, उद्योग व ऊर्जा क्षेत्र आणि कचरा जाळणे असे चार प्रमुख घटक त्यासाठी कारणीभूत आहेत. शहरात दररोज सुमारे १२०० ते १५०० टन डेब्रिज गोळा होते. ते सध्या देवनार डंपिंग ग्राऊंडवर टाकले जात आहे. त्यामुळे डेब्रिजच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यासाठी पालिकेने पहिल्या टप्प्यात पश्चिम उपनगरांतील नऊ विभागांतील डेब्रिज संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्याचे कंत्राट ॲन्टोनी वेस्ट हॅण्डलिंग सेल कंपनीला दिले आहे. कंपनीद्वारे दररोज प्रत्येकी ६०० टन डेब्रिजवर प्रक्रिया करणारे दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत.

शहरातील वायू उत्सर्जनामध्ये बांधकाम व तोडलेल्या कामाच्या कचऱ्याचा मोठा वाटा आहे. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा योग्य अंदाज लावणे, बांधकाम प्रकल्पांचा मागोवा घेणे, डेब्रिज वाहून नेणारी वाहने झाकणे आणि पुनर्वापराकरिता नेल्या जाणाऱ्या डेब्रिजवर योग्य ती देखरेख ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डेब्रिजपासून बांधकाम उत्पादने
डेब्रिजवर यांत्रिक प्रक्रिया करून त्यातून बांधकाम क्षेत्राशी संबंधित उपयुक्त उत्पादने बनवली जाणार आहेत. त्या उत्पादनांची बाजारात विक्री करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर सोपवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com