प्रत्येक विद्यार्थ्याची होणार झाडाझडती

प्रत्येक विद्यार्थ्याची होणार झाडाझडती

मुंबई, ता. १४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी पहिल्यांदाच जीआर जारी करण्यात आला आहे. यानुसार परीक्षेला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची कॉपीसाठी झाडाझडती घेतली जाणार आहे. यासाठी पोलिस पाटील, कोतवाल, शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेच्या महिला कर्मचाऱ्यांकडून मुलींची तपासणी केली जाणार आहे.
राज्यात बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च तर दहावीची २ मार्च ते २५ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी मंडळाकडून यावेळी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर केले जाणार आहे. तर शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करून त्यासाठी जनजागृती केली जाणार आहे.
कॉपी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांची जिल्हा दक्षता समित्या नियुक्त केल्या जातील तसेच महसूल विभागाची बैठी पथके आणि पूर्णवेळ बैठे पथक नेमली जाणार आहेत.प्रत्येक तालुक्यासाठी एक पथके असमतील तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दौरे करतील.
---
झेरॉक्स दुकाने बंद
परीक्षा केंद्राच्या एकूण ५० मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, तर अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण केले जाणार असल्याने त्यासाठी १९७३ च्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश दिले जाणार आहेत. परीक्षा केंद्रांच्या ५० मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवली जाणार असून सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर झडती घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com