महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष बेस्ट बससेवा कार्यान्वित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष बेस्ट बससेवा कार्यान्वित
महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष बेस्ट बससेवा कार्यान्वित

महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष बेस्ट बससेवा कार्यान्वित

sakal_logo
By

महाशिवरात्रीनिमित्त शनिवारी
बेस्टच्या अतिरिक्त बस
मुंबई, ता. १५ : महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी कान्हेरी लेणी आणि बाबुलनाथ मंदिराला भेट देत असतात. त्यादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाने शनिवारी (ता. १८) या मार्गावर अतिरिक्त बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी लेण्यांकडे आणि बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाहतुकीची सोय करण्यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी मार्गावर बसमार्ग क्र. १८८ (मर्या.) च्या सहा अतिरिक्त बस सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० दरम्यान चालविण्यात येणार आहेत. बाबुलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्र. ५७ (वाळकेश्वर ते पी. टी. उद्यान, शिवडी), बसमार्ग क्र. ६७ (वाळकेश्वर ते अँटॉप हिल) आणि बसमार्ग क्र. १०३ (वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक) अशा तिन्ही मार्गांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ दरम्यान सहा अतिरिक्त बस चालविण्यात येतील.