शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

मुंबई, ता. १५ : राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी चर्चा झाली. मात्र, त्यासाठीचे इतिवृत्त आमच्या हाती येईपर्यंत आमचा कामकाजावरील बहिष्कार सुरूच राहाणार, अशी भूमिका विद्यापीठ, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने‍ घेतली आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. १६) राज्यात सकाळी १० ते ५ या वेळेत कर्मचारी संघटनांकडून लाक्षणिक संप केला जाणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली.

२ फेब्रुवारीपासून शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी परीक्षा आणि इतर कामकाजावर बहिष्काराचे आंदोलन सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा आणि कामकाजावर परिणाम होत असल्याने आज वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समितीची बैठक झाली. या बैठकीत सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना, सातव्या वेतन आयोगाची ५८ महिन्यांची थकबाकी, तसेच राज्यातील १ हजार ४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी वित्त आणि उच्च शिक्षण विभागाला कर्मचारी संघटनांच्या मागणीसंदर्भात निर्देश दिले आहेत. मात्र, बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भातील इतिवृत्त आम्हाला तातडीने मिळावे, अशी मागणी करत संयुक्त‍ कृती समितीने आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, तसेच आपापल्या महाविद्यालयांच्या ठिकाणी जमा होऊन दिवसभर लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. त्यावेळी शिक्षकेतर कर्मचारी हे बायोमेट्रिक किंवा हजेरी रजिस्टरवर स्वाक्षरी करणार नसल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com