राज्यातील एकुलत्या एक ५९‍ लेकींना युजीसीची फेलोशिप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील एकुलत्या एक ५९‍ लेकींना युजीसीची फेलोशिप
राज्यातील एकुलत्या एक ५९‍ लेकींना युजीसीची फेलोशिप

राज्यातील एकुलत्या एक ५९‍ लेकींना युजीसीची फेलोशिप

sakal_logo
By

मुंबई, ता १६ : पीएचडीच्या माध्यमातून शोध आणि संशोधनासाठी राज्यातील ५९ सावित्रीच्या लेकी या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) ‘सावित्रीबाई जोतिबा फुले गर्ल चाईल्ड फेलोशिप’साठी (एसजेएसजीसी) पात्र ठरल्या आहेत. त्यासाठीची यादी आयोगाने नुकतीच जाहीर केली आहे. विशेष म्हणजे फेलोशिप जाहीर झालेल्या सर्व मुली या त्या-त्या कुटुंबातील एकुलत्या एक मुली असल्याची माहिती युजीसीकडून देण्यात आली.

युजीसीने नुकतेच पीएचडीसाठी दिली जाणाऱ्या ‘सावित्रीबाई जोतिबा फुले गर्ल चाईल्ड फेलोशिप’चा निकाल जाहीर केला असून त्यात देशातील विविध विद्यापीठे, महाविद्यालयातील १,१०३ मुली फेलोशिपसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील ५९ मुलींचा समावेश आहे. तर केरळातील सर्वाधिक २२१ मुली पात्र ठरल्या आहेत. तर त्या खालोखाल पश्चिम बंगालमधील २०३ आणि तमिळनाडूतील १८८ मुली पात्र ठरल्या आहेत. सर्वात कमी संख्या ही सिक्कीम, त्रिपुरा, बिहार, पंजाब, मध्यप्रदेश आणि गुजरात आदी राज्यातील आहे. गुजरातसारख्या राज्यातून केवळ ३२; तर मध्यप्रदेशातून केवळ १६ जणींचा पात्र यादीत समावेश आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील फेलोशिप पात्र मुलींची संख्या ही ५९ असून ती इतर कमी संख्या असलेल्या राज्याच्या तुलनेत मोठी आहे.

संशोधन करण्यासाठी मुस्लीम मुलींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली असून राज्यातील ५९ मुलींमध्ये सात जणींचा समावेश आहे. त्यात बातूल फातिमा, फराह फेरावल्ला, अना खान, सानिया सय्यद‍, फातिमा सय्यद आदी मुलींनी ''सावित्रीबाई जोतिबा फुले गर्ल चाईल्ड फेलोशिप''मध्ये स्थान पटकावले आहे.

अशी मिळणार फेलोशिप
एसजेएसजीसी या फेलोशिपसाठी पात्र ठरलेल्या मुलींना त्यांचे पीएचडीचे संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठीच्या कालावधीसाठी १ एप्रिलपासून जेआरएफसाठी प्रतिमाह ३१ हजार रुपये, तर एसआरएफसाठी ३५ हजार रुपये उर्वरित काळासाठी मानधन म्हणून दिले जाणार आहे. ते सर्व त्यांच्या बँक खात्यात युजीसीकडून दिले जाणार असल्याची सांगण्यात आले.

देशभरातील फेलोशिपची संख्या
राज्य फेलोशिपची संख्या
केरळ २११
पश्चिम बंगाल २०५
तमिळनाडू १८८
आसाम ६५
महाराष्ट्र ५९
उत्तर प्रदेश ५८
कर्नाटक ५६
आंध्र प्रदेश ३३
दिल्ली २६
पंजाब १३
हरियाना १८
जम्मू काश्मीर ७