Thur, June 1, 2023

देहविक्री करणाऱ्या महिलांनी घेतला म्युझिक थेरपीचा आनंद
देहविक्री करणाऱ्या महिलांनी घेतला म्युझिक थेरपीचा आनंद
Published on : 18 February 2023, 2:16 am
मुंबई, ता. १७ : कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी ‘म्युझिक थेरपी’चे आयोजन करण्यात आले होते. ‘अपने आप महिला सामूहिक आणि जीवन संगीत संस्था’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कामाठीपुराच्या ११ व्या गल्लीत आयोजित या कार्यक्रमातून संगीताद्वारे मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यात १०० हून अधिक महिला आणि पुरुषांनी सहभाग नोंदवला. जीवन संगीतचे संस्थापक डॉ. संतोष बोराडे, सीईओ प्रीतिश चौधरी, रिदम नरेंद्र, मंजू व्यास, संजीता जोशी आणि नागपाडा पोलिस निरीक्षक राजश्री आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम अवस्थी, अपूर्वा शिंदे यांनी केले.