दुचाकीवरील सहप्रवाशाला श्वासचाचणीचे बंधन नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकीवरील सहप्रवाशाला श्वासचाचणीचे बंधन नाही
दुचाकीवरील सहप्रवाशाला श्वासचाचणीचे बंधन नाही

दुचाकीवरील सहप्रवाशाला श्वासचाचणीचे बंधन नाही

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या सहप्रवाशाला दारू पिण्यासंबंधीची श्वासचाचणी बंधनकारक नाही, असा निकाल मुंबई सत्र न्यायालयाने एका प्रकरणात दिला. संबंधित प्रकरणात एका दुचाकीस्वाराने वेगात दुचाकी चालवून एका वाहतूक पोलिसाला जखमी केल्याची घटना घडली होती. याबाबत पोलिसांनी दोघांवरही गुन्हा दाखल केला होता; मात्र न्यायालयाने या प्रकरणात सहप्रवाशाला क्लीन चिट दिली आहे. या प्रकरणात त्याच्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावे अभियोग पक्षाने दाखल केले नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणात अनेकदा वाहतूक पोलिस वाहन चालवणाऱ्यांची घटनास्थळी यंत्राद्वारे श्वास चाचणी घेतात. त्यामुळे संबंधित वाहनचालक दारूच्या नशेत आहे की नाही, हे तपासणे पोलिसांना सुलभ जाते; मात्र दुचाकी चालकासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अशी चाचणी सक्तीची नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच अशी चाचणी करण्यासाठी वाहतूक पोलिस संबंधितावर सक्ती करू शकत नाही, असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.