तीन लाखांहून अधिक महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास

तीन लाखांहून अधिक महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राज्यात ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ या मोहिमेतून महिला त्यांच्या आरोग्याबाबत गंभीर नसल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. या उपक्रमात साडेतीन लाख महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्राथमिक निदान करण्यात आले आहे. यामागे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, आनुवंशिकता आदी कारणे सांगितली जात आहेत.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे जीवनशैलीचे आजार लोकांवर परिणाम करत आहेत. स्त्री असो वा पुरुष, वृद्ध असो वा तरुण, प्रत्येक वयोगटाला याचा फटका बसतो. राज्य सरकारने गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात नियमित स्क्रीनिंगव्यतिरिक्त ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अंतर्गत ३० वर्षांहून अधिक वयाच्या महिलांसाठी विशेष स्क्रीनिंग मोहीम सुरू केली होती. या मोहिमेअंतर्गत राज्यात १.४ कोटी महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४ टक्के महिलांची तपासणी मुंबई शहरात करण्यात आली होती. या मोहिमेत राज्यभरातील ३,४४,६०६ महिलांमध्ये उच्च रक्तदाब; तर दोन लाखांहून अधिक महिलांना मधुमेह झाल्याचे निदान झाले.

मुंबईत पाच टक्के महिलांना रक्तदाब
मुंबईतील एकूण दोन लाखांहून अधिक महिलांची उच्च रक्तदाबाची तपासणी करण्यात आली, त्यापैकी पाच टक्के महिलांना रक्तदाब आणि २,०५,३४५ मधुमेहाची तपासणी करण्यात आली, त्यापैकी चार टक्क्यांना मधुमेह असल्याचे निदान झाले. तपासणीमध्ये संशयास्पद आढळलेल्या रुग्णांच्या संपूर्ण निदानासाठी रुग्णालयात पाठवले जाते, जेथे विविध चाचण्यांनंतर आजाराचे निदान होते, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

धूम्रपान, मद्यपान करणाऱ्यांची संख्या जास्त
आनुवंशिकता, स्वभाव आणि मानसिक तणावामुळे शरीरात कॉटिकोलामाईन, एड्रेनालाईन आणि नॉरड्रेनालाईनचा स्राव वाढतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो. धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आहारात मिठाच्या अतिसेवनामुळेही उच्च रक्तदाब होऊ शकतो. लठ्ठपणा आणि जास्त वजन यांचा उच्च रक्तदाबाशी जवळचा संबंध आहे. वजन जितके जास्त तितका रक्तदाब वाढतो, असे निदर्शनास आले.

कोणती खबरदारी घ्यावी?
वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत योगाभ्यास करणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब व्यायाम आणि योगासने कमी करता येतो. चालणे, पोहणे, सायकल चालवणे, धावणे हे व्यायामाचे फायदेशीर प्रकार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com