Mon, June 5, 2023

पु. ल. देशपांडे अकादमीत
मार्चपासून महिला कला महोत्सव
पु. ल. देशपांडे अकादमीत मार्चपासून महिला कला महोत्सव
Published on : 19 February 2023, 4:00 am
मुंबई, ता. १९ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १२ मार्च २०२३ या कालावधीत महिला कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘मी आनंदयात्री’ अशी यावर्षीच्या महोत्सवाची थीम आहे. महोत्सवात इच्छुक महिला कलाकार, महिला केंद्रित संस्थांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज, प्रस्ताव वा सादरीकरणाची चित्रफीत mahotsav.pida@gmail.com या ई-
मेलवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सादरीकरणासाठी अंतिम निवड झालेल्या कलाकार, संस्थांना १ मार्च २०२३ पर्यंत कळवण्यात येणार आहे. सदरची निवड ही अकादमीच्या समितीमार्फत ठरवण्यात येईल, अशी माहिती प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांनी दिली.