मुलीच्या लग्नात सहभागी होण्यास आरोपीला परवानगी

मुलीच्या लग्नात सहभागी होण्यास आरोपीला परवानगी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : जन्मदात्या आईची निर्घृण हत्या करून तिचे अवयव खाण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावलेल्या नशेखोर आरोपीला स्वतःच्या मुलीच्या लग्नात सहभागी होण्याची सशर्त परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. आरोपी सुनील कुचकोरवी याला कोल्हापूर सत्र न्यायालयाने जुलै २०२१ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली आहे.

सुनील कुचकोरवी याच्या मुलीचा विवाह होणार असून त्यासाठी सात दिवस जाण्याची परवानगी त्याने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागितली होती. न्या. अजय गडकरी आणि पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने ही परवानगी मंजूर केली आहे. जोपर्यंत त्याच्या अपील याचिकेवर सुनावणी होत नाही, तोपर्यंत देहदंड सुनावलेल्या व्यक्तीला जामीन मंजूर होत नाही; मात्र मुलीचे लग्न असल्यामुळे लग्नाला हजर राहण्याची परवानगी देत आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत २३ ते २५ फेब्रुवारी या कालावधीसाठी त्याला लग्नात हजर राहण्याची परवानगी असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

शिक्षेविरोधात आरोपीची याचिका
१) आरोपीला फाशी का सुनावली, असा सवाल न्यायालयाने केला. यावर त्याने त्याच्या आईची नशेत असताना हत्या केली आणि तिचे अवयव टेबलवर ठेवून दिले. तो ते खाणार होता, असे पोलिस फिर्यादीमध्ये म्हटल्याचे त्याचे वकिल युग चौधरी यांनी खंडपीठाला सांगितले. यामध्ये उद्देश काय आहे, असे खंडपीठाने विचारले; मात्र याबाबत सुस्पष्टता नाही.
२) आरोपी प्रत्यक्षात खूप चांगला माणूस आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण कुंटुबालाच धक्का बसला. आरोपीला डोकेदुखीचा आजार आहे आणि तो दारूही प्यायचा, असे यावेळी सांगण्यात आले. आरोपी गरीब असल्यामुळे पोलिस सुरक्षेचा खर्च राज्य सरकारने करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. फाशीच्या शिक्षेविरोधात आरोपीने याचिका केली आहे आणि राज्य सरकारनेदेखील शिक्षा कायम होण्यासाठी अपील केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com