राज्यभरात आजपासून टेट परीक्षेला सुरुवात

राज्यभरात आजपासून टेट परीक्षेला सुरुवात

मुंबई, ता. २१ : राज्यातील सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत उद्यापासून (ता. २२) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेला राज्यभरातून तब्बल दोन लाख ३९ हजार ७२६ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा टप्प्या-टप्प्याने ३ मार्चपर्यंत घेतली जाणार असल्याचे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले; तर परीक्षेनंतर आठवड्याभरातच निकाल जाहीर केला जाणार आहे.

पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असून त्यात ऑनलाईन पेपरमध्ये बहुपर्यायी प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय देण्यात येणार आहेत. या परीक्षेत मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण होण्याची संधी राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये मिळणार असल्याने उमेदवारांकडून जोरदार तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील शाळांमध्ये सन २०१९-२० च्या संचमान्यतेनुसार प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची सुमारे ३७,०८४ पदे रिक्त आहेत यातील ५० टक्के पदे ही टेट परीक्षेच्या निकालानंतर भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने तयारीही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com