शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप मागे

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई, ता. २२ : मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेला विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनांचा संप आज मागे घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबात सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आल्याने संप मागे घेण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने केली.
राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी २ फेब्रुवारीपासून बहिष्कार आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या कामकाजावर परिणाम झाला होता. शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे हे आंदोलन मागे घेतले जावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत बैठक घेतली होती; मात्र बैठकीचे इतिवृत्त देताना अधिकाऱ्यांकडून मागण्यांसंदर्भातील महत्त्वाची माहिती दडवण्यात आली होती. त्यावर कर्मचारी संघटनांनी संताप व्यक्त करत आंदोलन सुरूच ठेवले.
अखेर त्याबाबत तातडीने दखल सरकारकडून घेण्यात आली आणि सर्व मागण्या संदर्भात सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशा आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेतले जात असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
--
एसएनडीटीतील आंदोलन माघारी
आंदोलनादरम्यान मुंबई विद्यापीठ तसेच त्याअंतर्गत येणाऱ्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये मागील अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटनांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. तसेच एसएनडीटी विद्यापीठ परिसरातही कर्मचाऱ्यांकडूनही वेळोवेळी मागण्या लावून धरण्यात आल्या होत्या. परंतु आता सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने तूर्तास आंदोलन मागे घेत असल्याचे एसएनडीटी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे महासचिव यशवंत गावडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com