तरुणांनी पुढाकार घ्यावा ः बिपिन जगताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांनी पुढाकार घ्यावा ः बिपिन जगताप
तरुणांनी पुढाकार घ्यावा ः बिपिन जगताप

तरुणांनी पुढाकार घ्यावा ः बिपिन जगताप

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : राज्यात शेतीपूरक क्षेत्रात उद्योजक होण्याच्या खूप संधी असल्याने तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजे. या माध्यमातून एक उद्योजकाची चळवळ आणि त्यातून उद्योजकांचा एक नवा महाराष्ट्र निर्माण होईल. यासाठी प्रत्येक तरुणाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य खादी ग्रामोद्योग विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी यिनच्या अधिवेशनात केले.
‘गोडवा जगण्यातला’ या विषयावर त्यांनी आज यिनच्या अधिवेशनात आपले विचार मांडत मधमाशी पालन, मध उत्पादन आणि मधुपर्यटन आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. तसेच त्यासाठीच्या असलेल्या योजना आदींची माहिती देत तरुणांना या क्षेत्राकडे कसे येता येईल, याचे मार्ग सांगितले. जगताप पुढे म्हणाले की, खादी ग्रामोद्योग आदींकडून जिल्हास्तरावर तरुणांना उद्योजक व्हावे, म्हणून जनजागृती केली जाते. त्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध होते, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. शासनाच्या विविध योजना शेतकरी घटकांपर्यंत पोचविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.